306 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये जनतेने मला प्रचंड मतांनी निवडून दिले. पाच वर्षात जनतेचा विश्वास सार्थ ठरविणयासाठी शासनाच्या दारोदारी सतत पाठपुरावा केला. शासनाच्या विविध विभागांचे उंबरठे झिजवले. विरोधकांना तीस वर्षात जमले नाही, ती विकास कामे केवळ पाच वर्षात केली. त्यामुळेच मतदार संघातील जनता जनार्दनाचा मला उस्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. अशी माहिती देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांनी दिली.
देवळाली विधानसभा मतदारसंघात सध्या प्रचाराचा जोर वाढलेला आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. या पार्श्वभूमीवर देवळाली विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यासोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मतदारसंघात मला मतदारांचा पाठिंबा वाढतो आहे. दौऱ्यात भेटलेला प्रत्येक नागरिक ताई तुम्ही पाच वर्षात खूप विकास कामे केली. आजवर कुणाला जमली नाही,असे कामे तुम्ही करून दाखवली. विकासकामामुळे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, चिंता करू नका, येत्या निवडणुकीत आम्ही तुम्हालाच पुन्हा एकदा संधी देऊ,अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया मतदार संघात मला भेटलेल्या नागरिकांकडून प्राप्त होताना दिसतात. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येईल. अशी मला खात्री आहे.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय

विरोधकांची चिंता नाही : आमदार अहिरे
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत मला विरोधकांची अजिबात चिंता वाटत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे जनता माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. याचा मला पूर्ण विश्वास आहे. प्रचारादरम्यान माझ्यासोबत जनता सकारात्मक पद्धतीने संवाद साधते आहे. त्यावर पुढचे राजकीय भवितव्य मला स्पष्टपणे दिसून येत आहे. खेड्यापाड्यात विकास कामे केली, मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला, जनतेच्या अडीअडचणीला धावून गेले, त्यांना योग्य वेळी योग्य ती मदत केली,त्याचा परिणाम म्हणून जनता माझ्या सोबत आहे. त्यामुळेच मला विरोधकांची अजिबात चिंता वाटत नाही. असे आमदार सरोज अहिरे यांनी सांगितले.