Home Blog जातीनिहाय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार!; सिन्नर मतदार संघातील...

जातीनिहाय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार!; सिन्नर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांची माहिती

0
235 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी
देशभरात होत असलेली जातीनिहाय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू, अशी माहिती सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी दिली. सिन्नर तालुक्यात प्रचारादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे म्हणाले की, सध्या देशभरामध्ये विरोधी पक्ष जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करीत आहे. आरक्षणामध्ये योग्य ते प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. परंतु विद्यमान सरकार जातीनिहाय जनगणना करण्यास टाळाटाळ करीत आहे. विरोधी पक्षाने संसदेत वारंवार मागणी करून देखील याप्रश्नी केंद्र सरकार लक्ष पुरवत नाही. तसेच 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची मागणी देखील संसदेत विरोधी पक्षाने अनेक वेळा केलेली आहे. परंतु पंतप्रधान मोदी सरकार या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळत नसल्याची खंत उदय सांगळे यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आपल्याला मतदार संघात मतदारांनी संधी दिली, तर सिन्नर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाकडे आपण निश्चितपणे पाठपुरावा करू, मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगळे यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

बेरोजगार तरुणांना चार हजारांची मदत ; सांगळे
महाराष्ट्रात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. नोकरी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षणासाठी वारेमाप खर्च करून देखील त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे बेरोजगार तरुणांना किमान आधार मिळावा, या उद्देशाने दरमहा चार हजार रुपये मिळावे,यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,असे उदय सांगळे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version