Home Blog विकास कामामुळे आमदार अँड राहुल ढिकले यांना मतदार दुसऱ्यांदा संधी देणार!; महायुतीचे...

विकास कामामुळे आमदार अँड राहुल ढिकले यांना मतदार दुसऱ्यांदा संधी देणार!; महायुतीचे समन्वयक बाबुराव आढाव

0
446 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून महायुतीतर्फे अँड राहुल उत्तमराव ढिकले निवडणूक रिंगणात आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी विकास कामे केली. तसेच सामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला. त्यामुळे मतदार त्यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याची संधी देतील,असा विश्वास महायुतीचे समन्वयक तथा शिवसेनेचे नाशिक पूर्व विधानसभा प्रमुख बाबुराव ( विनायक ) आढाव यांनी व्यक्त केला.

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टीचे आमदार अँड राहुल ढिकले यांचा मतदारांसोबत उत्तम जनसंपर्क आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर त्यांचा भर असतो. पाच वर्षात आमदार ढिकले यांनी सामान्य जनतेसोबत नाळ जोडली आहे. कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सामाजिक व जातीय सलोख्यात कधीही तेढ निर्माण होऊ दिले नाही. सर्वांना सोबत घेऊन फिरणारा आमदार अशी त्यांनी प्रतिमा निर्माण केली. अतिशय साधे राहणीमान त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यामुळे आज तुम्हाला मतदार संघात सर्वत्र विकास कामे झालेली दिसतात. केवळ आश्वासन द्यायचे आणि वेळेत पुर्तता करायचे नाही, असे काम आमदार ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात केले नाही. उलट आश्वासन देताना विचार करून आश्वासन दिले. आणि आश्वासन दिलेच तर ते पूर्ण करून दाखविले. असे खास वैशिष्ट्य आमदार ढिकले यांचे आहे. जनता जनार्धन पुन्हा एकदा आमदार अँड राहुल ढिकले यांना विधानसभेत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निश्चितपणे पाठवतील, असा ठाम विश्वास मला वाटतो, असे बाबुराव आढाव यांनी सांगितले.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

महायुतीची वज्रमुठ ढिकलेंच्या पाठीमागे

महायुतीचे समन्वयक बाबुराव आढाव म्हणाले की, महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट,भारतीय जनता पार्टी,अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय आठवले गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे सर गट यांची एकत्रित वज्रमुठ आहे. सर्व नेते मंडळी संघटित असून आमदार अँड राहुल ढिकले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आमदार ढिकले यांना पुन्हा विजय करून दाखविणारच,असा निर्धार महायुतीच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version