704 Post Views
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर विधानसभा मतदार संघात इगतपुरी तालुक्यातील टाकेद गटाचा समावेश होतो. टाकेद गटातील मांजर गावाने मागील निवडणूक आमदार कोकाटे यांना ५२० पैकी ४५० मते दिली. परंतु गावातील ग्रामस्थांना साधे बस शेड देखील उपलब्ध करून दिले नाही, रस्त्यांची पण दुरावस्था आहे. याचे उत्तर कोकाटे यांनी स्थानिक नागरिकांना द्यावे,अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी केली.
टाकेद गटातील मांजर गावातील ग्रामस्थांसाठी बस शेडची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कुठेतरी झाडाचा, दुकानांच्या सावलीचा आसरा घेऊन ग्रामस्थांना ऊन,वारा,पावसात आणि थंडीत ताटकळत उभे राहावे लागते. विकासाच्या बडेजाव मिरवणाऱ्या आमदारांनी आपल्याला सर्वाधिक मताधिक्य दिलेल्या गावाकडे अशा प्रकारचे दुर्लक्ष करणे, योग्य नाही. बस शेड किरकोळ विषय आहे. तो तातडीने मार्गी लावायला पाहिजे, परंतु आमदारांनी तेथे हेतू पुरस्कर दुर्लक्ष केले, असे दिसून येते. त्याचप्रमाणे येथील रस्त्याची देखील प्रचंड दुरावस्था झालेली दिसते. पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरची खडी व मुरूम बाहेर पडतो.नागरिकांना ये जा करणे अवघड होते. जेष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना रस्ता अपघाताचे निमंत्रण ठरू शकतो, त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण प्राधान्याने करायला हवे होते. पण तसे झाले नाही. याची दखल विद्यमान आमदारांनी का घेतली नाही, याचे उत्तर त्यांनी ग्रामस्थांनी द्यायला हवे.असे उदय सांगळे यांनी म्हटले.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय