Home Blog खासदार राजाभाऊ वाजे आणि उमेदवार उदय सांगळे यांची सिन्नर मतदार संघात संयुक्त...

खासदार राजाभाऊ वाजे आणि उमेदवार उदय सांगळे यांची सिन्नर मतदार संघात संयुक्त प्रचाररॅली!; लक्षवेधक रॅलीने विरोधी पक्षात अस्वस्थता

0
590 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांचा प्रचार दौरा ठिकठिकाणी सुरू आहे. सोबत खासदार राजाभाऊ वाजे देखील उपस्थित आहेत. दोघांची संयुक्त प्रचार प्रचार रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्थानिक नागरिकांचा रॅलीला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे विरोधी पक्षात अस्वस्थता पसरल्याची चर्चा मतदारसंघात केली जात आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे सोमवारी ( दि.११ ) सकाळी आठ वाजता सिन्नर शहरातील सिन्नर गौरव, पंचवटी हॉटेल जवळ येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

नंदुर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

उद्घाटनानंतर डूबेरे, सोनारी, जयप्रकाश नगर, सोनांबे आणि कोनांबे या गावात खासदार राजाभाऊ वाजे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांची संयुक्त प्रचार रॅली पार पडली. रॅलीत स्थानिक गावातील नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

दरम्यान खासदार राजाभाऊ वाजे यांनी प्रचार रॅली दरम्यान भेटणाऱ्या ग्रामस्थांना महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना सर्वांनी मतदान करावे, तसेच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, आणि राष्ट्रीय काँग्रेस तसेच मित्र पक्षांच्या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी उदय सांगळे यांना निवडून आणावे, असे आवाहन केले. महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी देखील मतदारांनी आपल्याला संधी द्यावी, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाने सिन्नर मतदार संघाच्या विकासात नक्कीच हातभार लावू, असे आश्वासन प्रचार रॅली दरम्यान दिले. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version