Home Blog खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचार...

खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ; सांगळे यांना निवडून आणण्याचे केले आवाहन

0
551 Post Views

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उदय सांगळे यांच्या सिन्नर शहरातील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी ( दि.११ ) सकाळी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले. सांगळे यांचे प्रामाणिकपणे काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे, असे आवाहन खासदार वाजे यांनी केले.

याप्रसंगी भारत कोकाटे,संजय सोनावणे, किरण डगळे, गोविंद लोखंडे, नामदेव कोतवाल,दत्ता वाईचळे, मंगला गोसावी, म्युजिद खतीफ,जालिंदर थोरात,बापू थोरात,सुनील चकोर,गणेश घोलप,रुपेश मुठे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार वाजे पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला हवे, प्रामाणिक काम केले तर त्याचा त्याचे फळ उत्तम मिळते. महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवार उदय सांगळे यांना निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. मतदार संघातील प्रत्येक गावागावात,घराघरात जाऊन सांगळे यांचा प्रचार करावा. तरुण व तडफदार नेतृत्व असल्यामुळे मतदार संघाला सांगळे यांच्या नेतृत्वाचा निश्चितपणे लाभ होईल, असे खासदार वाजे यांनी म्हटले.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँकेत मंगल कार्यालय

ज्येष्ठांचा आशीर्वादाचे विजय मिळणार : सांगळे

सिन्नर विधानसभा मतदार संघामध्ये ज्येष्ठ नेतेमंडळी यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. प्रचारादरम्यान मला त्यांचेच प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित होईल, असा मला विश्वास आहे. असे महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version