Home Blog मोदींच्या सभेतून देवळाली मतदार संघातील आमदार सरोज अहिरे याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार...

मोदींच्या सभेतून देवळाली मतदार संघातील आमदार सरोज अहिरे याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट!; राजश्री अहिरराव समर्थकांमध्ये नाराजीचा सूर

0
1,043 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार सरोज अहिरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर उपस्थिती पहायला मिळाली. यावेळी मोदी यांनी उमेदवारांच्या हातात हात धरून हात उंचावत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन केले. परिणामी आमदार अहिरे याच देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचे अधोरेखित झाले. राजश्री अहिरराव यांच्या समर्थकांमध्ये यामुळे नाराजी असल्याची चर्चा केली जात आहे.

देवळाली विधानसभा मतदार संघात महायुतीने विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे नांदगाव विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रे पक्षाच्या अजित दादा पवार गटाचे नेते समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे कांदे अडचणीत आले. त्याचा परिणाम म्हणून शिंदे गटाने जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली मतदार संघात अजित दादा पवार गटाच्या उमेदवारांसमोर अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ए.बी. फॉर्म दिले.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार देवळालीतील राजश्री अहिरराव आणि दिंडोरीचे धनराज महाले यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली. पैकी अहिरराव यांनी माघार न घेता अर्ज कायम ठेवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनुष्यबाणाच्या चिन्हाचा वापर करीत मतदार संघात प्रचार सुरू ठेवला.

अहिरराव समर्थक प्रचार थांबवणार का?

राजश्री अहिरराव याच महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत, असा दावा त्यांचे समर्थक करीत होते. पण मोदी यांच्या जाहीर सभेत आमदार सरोज अहिरे यांना अधिकृत उमेदवार असल्याने व्यासपीठावर जागा मिळाली. त्यामुळे त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट झाले. आहिराव या महायुतीच्या अधिकृत उमेदवार नाहीत, म्हणून त्यांना मोदी यांच्या व्यासपीठावर जागा मिळाली नाही. त्यामुळे आता राजश्री अहिरराव समर्थक प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या फोटो आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर टाळणार की सुरूच ठेवणार, याविषयी उत्सुकता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version