Home Blog नाशिक पूर्वचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना बाल मित्रांनी दिले विजयाच्या...

नाशिक पूर्वचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना बाल मित्रांनी दिले विजयाच्या शुभेच्छाचे पत्र ; मतदार संघात चर्चेचा विषय

0
629 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांना नाशिक रोड परिसरातील दोन बालमित्रांनी पत्राद्वारे विजयाच्या शुभेच्छा दिल्या. बालमित्रांच्या शुभेच्छा पत्रात व्यक्त केलेल्या भावना मतदारसंघात चर्चेचा विषय आहे. पत्रातील भावनेमुळे आपण सुरू केलेल्या उपक्रमाचे आज फळ मिळाले, अशी प्रतिक्रिया आमदार अँड राहुल ढिकले यांनी दिली.

अँड राहुल ढिकले आमदार नसताना त्यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या जन्मतारखा संग्रहित केल्या. कुटुंबातील वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुली व मुले यांना सर्वांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा पत्र पाठविण्याचा उपक्रम सुरू केला. सोबत लहान मुलांना आणि महिलांना छोटीशी पर्स, स्टीलचे छोटे भांडे अशी भेटवस्तू देखील दिली. आजही हा उपक्रम सुरूच आहे. आपल्याला अचानक मिळणारे शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू मुळे आज आपला सरप्राईज वाढदिवस पार पडला.अशी भावना मनात निर्माण होऊ लागली.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

केवळ एका वर्षासाठी ही वाढदिवसाची सरप्राईज नव्हती. तर प्रत्येक वाढदिवसाला शुभेच्छा मिळत गेल्याने ढिकले यांनी सुरू केलेल्या उपक्रमाची व्याप्ती वाढली. उपक्रमाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. त्याचा परिणाम म्हणून जय भवानी रोड परिसरात राहणाऱ्या श्लोक व तन्वी लवटे या दोन चिमुकल्या मित्रांनी ढिकले यांना हार्दिक विजयाचे पत्र पाठवले. आम्ही तुम्हाला मतदान करू शकत नाही, परंतु आम्ही आई वडिलांना तुम्हाला मतदान करा. असे सांगितल्याचा पत्रात उल्लेख आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version