Home Blog शुभेच्छा नाही आबा,तिकड सीमाताईंचे काम कर. अन् इकड माझं काम कर :...

शुभेच्छा नाही आबा,तिकड सीमाताईंचे काम कर. अन् इकड माझं काम कर : महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या व्हायरल व्हिडिओ मुळे स्पष्टीकरणाची वेळ

0
975 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांची सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप सद्या चांगलीच व्हायरल होतांना दिसते. क्लिप मधील उजेडात आलेल्या संवादाची चर्चा सर्वच राजकीय पक्षाच्या पटलावर होतांना दिसते. व्हायरल झालेल्या अवघ्या नऊ सेकंदाच्या क्लिपचे स्पष्टीकरण देता देता गणेश गीते यांची चांगलीच फजिती होतांना दिसून येते आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर नाशिक पश्चिमचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना सोबत घेऊन जाहीर स्पष्टीकरण देण्याची वेळ गीते यांच्यावर ओढवली. यावरून त्या क्लिप मधील संवादाचे मोल लक्षात घेण्याजोगे आहे.

त्याचे झाले असे, नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामधून महाविकास आघाडीने गणेश गीते यांची उमेदवारी जाहीर केली. यादरम्यान त्यांचा वाढदिवस देखील होता, वाढदिवस आणि जाहीर झालेली उमेदवारी यामुळे गीते समर्थकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. गर्दीमध्ये आबा कापडणे या नावाची एक व्यक्ती होती. त्यांनी गीते यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी गणेश गीते यांनी आबा कापडणे यांना उद्देशून म्हटले की, शुभेच्छा जाऊ दे आपली सगळी टीम गोळा करा…, तिकडे सीमाताई चे काम कर…, अन् इकडं माझं काम कर असे सहजपणे वक्तव्य केले. विषय एवढ्यावर संपणारा अजिबात नव्हता, नेमक्या या संवादाचा कोणीतरी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढलेला होता. त्यावेळेस व्हिडिओचे कुणालाही एवढे महत्व समजले नाही.पण सर्वच पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर या व्हिडिओचे महत्त्व अधोरेखित झाले.

गीते यांचा व्हायरल व्हिडिओ बघा

महाविकास आघाडीत संभ्रम

नाशिक पश्चिम मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते व्हायरल व्हिडिओ क्लिप मुळे चांगलेच संतापले. गीते इकडे महायुतीचे उमेदवार सीमा हिरे यांचे काम करायला सांगतात, आणि तिकडे स्वतःचे अशी दुटप्पी अन् स्वार्थी भूमिका कशी काय घेऊ शकतात, यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.व्हिडिओ क्लिपमुळे महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. तसे झालेच तर महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार अडचणीत येऊ शकतात. त्याचा लाभ पर्यायाने महायुतीला होईल.असे लक्षात आल्यावर सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत गणेश गीते यांना मी आबा कापडणे यांची मजाक केली. सीमा हिरे आणि कापडणे क्लासमेट आहेत. म्हणून तसे म्हणालो. हवे तर कापडणे यांचे स्पष्टीकरण घ्या, ते द्यायला तयार आहेत. असे सांगत व्हायरल क्लिपच्या घटनेवर सावरा-सावर करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्य संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

मनातील संभ्रम दूर होईल का

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस असे तीन प्रमुख पक्ष आहे. यामध्ये नाशिक पूर्व मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गणेश गीते तर पश्चिम मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सुधाकर बडगुजर निवडणूक रिंगणात आहे. गीते यांच्या वायरल झालेल्या क्लिप विषयी बडगुजर आणि गीते यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र एकमेकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली झालेली संभ्रमवस्था नक्की दूर होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतांना दिसतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version