663 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अँड राहुल ढिकले यांना निवडून आणण्यासाठी आडगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर शपथ घेतली. कोणत्याही परिस्थितीत सलग दुसऱ्यांदा आमदार ढिकले यांना निवडून आणायचे, असा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यालय उद्घाटन वेळी दीडशे नारळे वाढविण्यात आली,हे विशेष घडले. तर प्रचार फेरी दरम्यान शंभरच्या वर महिलांनी औक्षण केले. आडगाव ग्रामस्थांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आमदार अँड राहुल ढिकले यांच्यासह समर्थक भारावून गेले.
शनिवार ( दि.९ ) सकाळी साडेआठ वाजता आडगाव येथील ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. मारुती मंदिरात गावकऱ्यांनी सामूहिक शपथ घेतली. ढिकले यांना पुन्हा विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.यानंतर गावामधून सर्वत्र प्रचार रॅली निघाली. यादरम्यान महिलांनी ठिकठिकाणी आमदार ढिकले यांचे औक्षण केले.
प्रचार रॅली दरम्यान आमदार ढिकले यांना मोठा प्रतिसाद मिळत होता. तसेच रॅलीमध्ये गर्दी झाल्याने ढिकले यांच्या समर्थकांचे चेहरे आनंदीत दिसत होते. रॅलीत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.त्यामध्ये प्रामुख्याने आमदार ढिकले यांना आडगाव येथून आडगाव ९० टक्के मतदान आम्ही मिळून देऊ, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. संपूर्ण गावाने एक मुखाने ढिकले यांना पाठिंबा दिला.
नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय