Home Blog शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटवल्याने आमदार सरोज अहिरे यांचा विहितगावात...

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटवल्याने आमदार सरोज अहिरे यांचा विहितगावात सत्कार ; दुसऱ्यांदा संधी मिळणार असल्याचा विश्वास

0
544 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदारसंघातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर बालाजी देवस्थान ट्रस्ट नाव होते. आमदार शरद अहिरे यांनी सरकारी दरबारात ग्रामस्थ आणि गावातील तरुण शेतकऱ्यांच्या मदतीने पाठपुरावा केला. सर्वांनी संघटित प्रयत्न केल्यामुळे उताऱ्यावरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटविले गेले. त्यानिमित्ताने प्रचारादरम्यान आमदार सरोज अहिरे यांचा विहितगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्येष्ठ नागरिकांनी सत्कार केला. तसेच पुन्हा एकदा मतदार तुम्हाला संधी देतील, असा विश्वास व्यक्त केला.

देवळाली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांचा शनिवारी ( दि.९ ) मतदारसंघातील वडनेर दुमाला, विहितगाव आदी भागात प्रचार दौरा पार पडला. यादरम्यान विहितगाव येथे आमदार सरोज अहिरे यांचा सत्कार झाला. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, आमदार सरोज अहिरे यांनी मागील अनेक वर्षापासून येथील पाच गावातील शेतकरी आपल्या उताऱ्यावरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटविण्यासाठी सरकारी दरबारी पाठपुरावा करीत होते. परंतु शेतकऱ्यांना यश मिळाले नाही. आमदार अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव हटवण्यासाठी गावातील काही तरुण शेतकऱ्यांनी त्यांना जुन्या दुर्मिळ कागदपत्रांचे सहकार्य केले. सर्वांच्या मदतीने संघटितपणे लढा दिला. परिणामी पाच गावातील त्रस्त शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील बालाजी देवस्थान ट्रस्टचे नाव अखेरीस शासनाने काढून टाकले. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला पूर्णविराम मिळाला. आमदार अहिरे यांच्या प्रयत्नामुळे यश मिळाले. त्यामुळे त्यांचा प्रचार आदरणीय सत्कार करण्यात आला.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

तीळ मात्र शंका नाही : आमदार सरोज अहिरे

देवळाली विधानसभा मतदारसंघात पाच वर्षात कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली. यामध्ये विहितगाव,वडनेर दुमाला रोड, सौभाग्य नगर आदी भागात कोट्यावधींची कामे केली. त्यामुळे मतदार पुन्हा एकदा मला संधी देतील, याविषयी मला तीळ मात्र शंका नाही. असे आमदार सरोज अहिरे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले.

यांची होती उपस्थिती

निवृत्ती अरिंगळे, शिवाजी हांडोरे, अतुल धनवटे, प्रभाकर पाळदे,सोमनाथ बोराडे, मनोहर कोरडे, बाबुराव मोजाड, दिलीप कोठुळे,संजय हांडोरे, धनाजी कोठुळे, कैलास हांडोरे, श्रीकांत हगवणे,रवींद्र हांडोरे,विक्रम कोठुळे, भगीरथ हांडोरे, शिवाजी कोठुळे, नाना हांडोरे,प्रणाली कोठुळे, आशा नवले, शोभाताई आवारे आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version