1,005 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार मोहिनी जाधव यांना पळसे गावातून युवकांनी मदतीचा पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला. येत्या निवडणुकीत उमेदवार जाधव यांना मतदार मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, असा विश्वास यावेळी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवा आगळे,ईश्वर गायखे, तालुका उपाध्यक्ष
शरद ढमाले मनविसे तालुकाध्यक्ष सुरज गायधनी, पप्पू गायधनी, हर्षद गायधनी, शिवा वैद्य, ज्ञानेश्वर पवार, मनोज आगळे, गौरव चव्हाणके, स्वप्निल शिंदे,सोनु गायधनी, सोनू जाधव,राहुल एखंडे आदी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून मनसेच्या उमेदवार मोहिनी जाधव गावागावात प्रचारासाठी फिरत आहे. दरम्यान त्यांना अनेक ठिकाणी मदतीचा धनादेश तसेच रोख रक्कम दिली जात आहे.त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना मनसेचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मदत म्हणून आर्थिक हातभार लावताना दिसतात. मनसे गावातील तरुणांनी दिलेल्या मदतीमुळे मोहिनी जाधव भाऊक झाल्या. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करीत धन्यवाद दिले.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी.बँक्वेट मंगल कार्यालय