Home Blog आमदार राहुल ढिकले यांचा आडगाव मुळे वस्तीवर अन् शेतकऱ्यांच्या बांधवांवर प्रचार ;...

आमदार राहुल ढिकले यांचा आडगाव मुळे वस्तीवर अन् शेतकऱ्यांच्या बांधवांवर प्रचार ; नव्वद टक्के मतदार ढिकले यांच्या बाजूने असल्याचा समर्थकांचा दावा

0
569 Post Views

नाशिकरोड: उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी गुरुवारी ( दि.७ ) आडगाव मळे वसाहतीवर तसेच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पत्रके वाटत प्रचार केला. यादरम्यान शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील नव्वद टक्के जनता आमदार ढिकले यांच्या बाजूने आहे. असा दावा व्यक्त केला जातो आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार अँड राहुल ढिकले दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. महायुती मधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीची त्यांना उमेदवारी मिळाली. उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पासून ढिकले यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार सुरू केला होता. आडगाव येथे किमान दोन ते तीन वेळा प्रचार झालेला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ढिकले यांचे समर्थक जोमाने प्रचाराला लागलेले दिसतात. यात गणेश माळोदे,अँड कैलास शिंदे ,सुरेश देशमुख ,संतोष भोर ,निवृत्ती शिंदे, शंकरराव नवले, तपकिरे अण्णा, सखाराम लभडे,प्रभाकर मते,विठ्ठल राजे माळोदे,संजय शिंदे,आदिनाथ दिवटे,राजू माळोदे,एकनाथ तपकीरे आदींचा समावेश आहे.

नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी ए.सी. बँक्वेट मंगल कार्यालय

गुरुवारी त्यांच्या समर्थकांनी आडगावच्या मुळे वस्तीवर प्रचार केला. नाशिक तालुक्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे गाव म्हणून आडगाव ओळखले जाते, पूर्वी शेकापचे गाव म्हणून आडगावची ओळख होती. परंतु मागील काही वर्षापासून येथे भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व निर्माण केले. गाव, खेड्यात शक्यतो भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद मिळत नाही असे बोलले जाते. आडगाव मात्र त्यास अपवाद आहे. येथील शेतकरी पूर्णपणे ढिकले यांच्या पाठीमागे असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याप्रमाणे प्रतिसाद ढिकले यांना मिळताना दिसतो.

मदतीसाठी धावणारा आमदार

आमदार अँड राहुल ढिकले यांनी आडगाव येथील भागात विकास कामे केली. नागरिकांच्या अडचणीला मदत करणारा आमदार अशी त्यांनी ओळख निर्माण केली.या वेळेला आडगाव येथील मतदार पुन्हा एकदा त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यास हातभार लावतील. असा विश्वास येथील कार्यकर्त्यांना दिसतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version