827 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार योगेश घोलप यांना मतदार निश्चितपणे निवडून देतील, तसेच पुन्हा एकदा विधानसभेत देवळालीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवळाली विभागाचे संघटक वैभव पाळदे यांनी केला.
देवळाली विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला आहे. पाच वर्षाचा अपवाद वगळता येथे कायम शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. मतदारसंघातील ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील मतदार शिवसेनेच्या विचारसरणीला मानणारा आहे. त्यामुळे योगेश घोलप यांना निवडणुकीत विजयी होण्यास खूप काही अडचण निर्माण होणार नाही. मतदार संघातील दौऱ्यात घोलप यांना मिळणारा प्रतिसाद बघता त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. त्यामुळे २०२४ ते २०२९ दरम्यान देवळालीचे मतदार योगेश घोलप यांना विधानसभेत नक्की पाठवतील. असा विश्वास वैभव पाळदे व्यक्त करताना दिसतात.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स
