ज्युनिअर चेंबर्स ऑफ इंटरनॅशनल च्या शिष्टमंडळाने बुधवारी [ दि.६ ] जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल अग्रवाल यांना निवेदन दिले. विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सहकार्याने शहरात मतदान जागरुकता मोहीम राबविणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. जेसीआय संघटनेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मित्तल यांनी दिले.
नांदूर – मानुर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी लॉन्स
शिष्टमंडळात जेसीआय नाशिक शहराध्यक्ष अमित जैन, जेसीआय नाशिकरोड अध्यक्ष मोहन सानप, युवा उद्योजक मिलींद इंगळे आदींचा समावेश होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समाजातील सामाजिक संस्थानी पुढाकार घेवून जनजागृती करावी, असे आवाहन केले. जेसीआय शिष्टमंडळाच्या पदाधिका-यांनी सांगीतले की, लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान आम्ही मतदानाचा हक्क बजाविणा-या जागरुक नागरिकांना वृक्षाची रोपे भेट दिली. यावेळी विधानसभा निवडणूक दरम्यान विविध महाविद्यालयांमध्ये जागरुकता सत्रे, निबंध स्पर्धा तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होर्डिंग उभारण्यात येणार असून नव मतदारांसाठी विशेष सेल्फी पॉइंट संकल्पना साकारण्यात येणार आहे.