Home Blog नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात मतदारांनी गणेश गीते यांना संधी द्यावी; माजी...

नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात मतदारांनी गणेश गीते यांना संधी द्यावी; माजी नगरसेवक अशोक सातभाई यांचे आवाहन

0
767 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गणेश गीते यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडी तर्फे गीते उमेदवार आहे.मतदारांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश गीते यांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी नगरसेवक तथा देवळाली व्यापारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अशोक सातभाई यांनी केले आहे.

अशोक सातभाई म्हणाले की, गणेश गीते यांनी नाशिक महापालिकेत काम केले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. सामाजिक प्रश्नांची त्यांना जाण आहे. वेळोवेळी त्यांनी गोरगरीब जनतेला मदत केली. त्यांच्या हक्कासाठी आवाज उठविला. मतदारांनी त्यांना संधी दिली तर ते निश्चितपणे मतदारांचा विश्वास सार्थ ठरवतील. याविषयी शंका नाही. गीते सामान्य कुटुंबातून पुढे आले आहे. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांच्या समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. महापालिकेत त्यांच्या प्रभागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. प्रभागात त्यांनी विकास कामे केली आहे. त्यामुळे मतदार त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील, असा मला विश्वास वाटतो.

नांदूर मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव ए.सी. बँक्वेट संजीवनी लॉन्स

महाविकास आघाडीने एक दिलाने काम करणार

गणेश गीते महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे प्रमुख तीन पक्ष आहे. सोबत काही घटक पक्ष आहेत.आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी एका दिलाने गीते यांचे काम करताना दिसतात.त्यांना निश्चितपणे निवडून आणतील, असे अशोक सातभाई यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version