452 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार अँड राहुल ढिकले यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्तम विकास कामे केली. त्याचा परिणाम म्हणून मतदार त्यांच्या कामकाजावर समाधानी आहेत. त्यामुळे त्यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मतदार राजा निवडून देईल. असा दावा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा नाशिक महापालिकेचे माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर यांनी केला आहे.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ढिकले यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. नागरिकांनी केलेल्या सूचनांची तातडीने दखल घेतली. योग्य ती उपाययोजना केली. नागरिकांच्या अडचणीच्या काळात धावून जाणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. पाच वर्षात मतदार संघात सामाजिक सलोखा व शांतता प्रस्थापित होईल, यावर त्यांचे विशेष लक्ष होते. विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना मतदार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून देतील. असा आत्मविश्वास संभाजी मोरुस्कर यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये नाशिक रोड परिसरातील जनतेने ढिकले यांच्या बाजूने कौल दिला. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीला पुन्हा होईल. असे मोरुस्कर यांनी सांगितले.
नांदूर – मानूर परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज एसी बँक्वेट संजीवनी लॉन्स
नाशिक पूर्व भाजपचा बालेकिल्ला