Home Blog ओढा येथे आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ; मतदार संघात अहिरे...

ओढा येथे आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा ; मतदार संघात अहिरे यांनी साधला विकासाचा समतोल, माजी खासदार देविदास पिंगळे यांचे प्रतिपादन

0
464 Post Views

नाशिकरोड : प्रतिनिधी 

आमदार सरोज आहिरे यांनी संघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. मतदार संघात सर्वत्र विकासकामाना प्राधान्य दिले. विकासकामांची गंगा मतदार संघात आणून दाखवली. त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीची निश्चित उभे राहतील. असा विश्वास माजी खासदार व राष्ट्रवादीचे नेते देविदास पिंगळे यांनी व्यक्त केला. ओढा येथील प्राचीन श्रीगणेश मंदिराच्या सभागृहात मंगळवारी ( दि.२९ ) कार्यक्रम पार पडला. त्यावेळी पिंगळे बोलत होते.

याप्रसंगी महायुतीच्या उमेदवार सरोज आहिरे यांनी गणपतीचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ वाढविला. कार्यक्रमाच्या अध्य्क्षस्थानी माजी खासदार देविदास पिंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,तालुका शेतकी संघाचे चेअरमन दिलीप थेटे,माजी जि.प. सदस्य यशवंत ढिकले, महिला तालुकाध्यक्ष शीतल भोर, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल धनवटे,संजय तुंगार, सरपंच प्रिया पेखळे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. प्रास्ताविक साहेबराव पेखळे यांनी केले. ते म्हणाले कि, मतदार संघात प्रत्येक गावात विकासकामे झाली. आमदार अहिरे यांच्या कामाची ती पावती आहे. मनोगत व्यक्त करताना अतुल धनवटे यांनी महायुतीमध्ये भाजप सोबत आहे.

नांदूर नाका परिसरात विवाह समारंभासाठी एकमेव सुसज्ज संजीवनी बँक्वेट हॉल

भाजपासह सर्व आघाड्या आमदार अहिरे यांच्या प्रचारासाठी सज्ज राहतील, असा विश्वास व्यक्त केला. आमदार सरोज आहिरे यांनी सांगितले की, जनतेच्या विकासासाठी आपण राजकारण न करता प्रत्येक विभागात विकास कामे केली आहे. त्यामुळे मतदार आपल्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा देवळाली विधानसभा मतदारसंघात काम करण्याची संधी निर्माण करून देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version