Home Blog देवळालीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र ; राजश्री अहिरराव यांना दिली उमेदवारी,...

देवळालीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धक्कातंत्र ; राजश्री अहिरराव यांना दिली उमेदवारी, चुरशीची तिरंगी लढत अटळ

0
2,731 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

देवळाली विधानसभा मतदार संघामध्ये मंगळवारी ( दि. २९ ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यपूर्ण घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक राजश्री अहिराव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अहिरराव यांना धनुष्यबाण निशाणी मिळणार आहे. राजकीय क्षेत्रात या घटनेने खळबळ उडाली. महायुतीची ही मैत्रीपूर्ण लढत म्हणावी की बंडाळी, असा प्रश्न आता निर्माण झाला. यामुळे देवळालीत आमदार सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप आणि राजश्री अहिराव यांच्यामध्ये चुरशीची तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान आमदार सरोज अहिरे आणि माजी आमदार योगेश घोलप यांच्यात समोरासमोर लढत होईल, असे चित्र होते. मंगळवारी अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजश्री अहिराव यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली. शेवटच्या अवघ्या दहा मिनिटात ही नाट्यपूर्ण घटना घडली. असे वरवर दिसत दिसत असले, तरी हा पूर्वनियोजित कट होता. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजश्री अहिरराव यांना धनुष्यबाण निशाणी मिळाल्यामुळे त्याचा निवडणुकीत कुणाला राजकीय फटका बसणार ?, आमदार अहिरे यांना की माजी आमदार योगेश घोलप यांना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचे उत्तर निवडणूक निकालानंतर मिळणार आहे.

नांदूर – मानूर परिसरात विवाह, समारंभासाठी सुसज्ज संजीवनी लॉन्स

अहिरराव समर्थकांमध्ये उत्साह

देवळाली विधानसभा मतदार संघामधून आपण तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी करणार, अशी भूमिका राजश्री अहिराव यांनी जाहीर केली. त्यामुळे अहिरराव तिसऱ्या आघाडी आघाडी कडून निवडणूक रिंगणात उतरतील, अशी अपेक्षा होती. मंगळवारी अपेक्षाचा भंग झाला. त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. परिणामी अहिराव गटांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Nashik Batmidar News
Exit mobile version