जेष्ठ नेते बाबुराव आढाव यांचा दावा
नाशिक लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघातून निश्चितपणे निर्णायक मतांची आघाडी मिळवून देऊ , असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाबुराव तथा विनायक आढाव यांनी केला आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघात सध्या निवडणूक प्रचार जोरदारपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे म्हणजेच महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात बाबुराव आढाव यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या समर्थकांसह गोडसे यांच्या प्रचारासाठी आढाव परिश्रम घेत आहे. गोडसे यांना मागील निवडणुकी पेक्षा अधिकचे मताधिक्य मिळवून देऊ, असा निर्धार आढाव आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून आढाव हे गोडसे यांच्या प्रचारात व्यस्त आहे. गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आढाव यांनी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भ्रमणध्वनी द्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून संपर्क सुरू केला आहे.
विजयाची हैट्रिक होईल
२०१४, २०१९ असे सलग दोन वेळा निवडून आलेले आहे . त्यांनी मतदार संघात केलेला विकास अन सतत नागरिकांच्या संपर्कात राहणे, सामान्य व्यक्तीला मोबाईल वर प्रतिसाद देणे, तसेच लहान मोठ्या अश्या सर्वच स्तरातील नागरिकांच्या अडचणी , समस्या सोडविण्यासा ठी पुढाकार घेणे हे गोडसे यांचे वैशिष्ट्य असून यंदा ते विजयाची हैट्रिक करून इतिहास रचणार आहे.

बाबुराव ( विनायक ) आढाव
अध्यक्ष, नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ
शिंदे गट शिवसेना
