देवळाली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्या राजश्री अहिराव यांनी बच्चू कडू यांच्या परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीकडून किंवा अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय निश्चित केला आहे. निर्णयावर आपण ठाम असून काहीही झाले तरी निवडणूक लढणारच, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
मागील काही दिवसांपासून देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राजश्री अहिराव निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. त्यांनी आपल्या तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन प्रचाराला सुरुवात केली. सुरुवातीला भारतीय जनता पार्टी आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून त्या इच्छुक आहे. शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी उमेदवारीची मागणी देखील केली होती. परंतु ऐनवेळी देवळालीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राजश्री अहिरराव यांच्या समर्थकांनी ताई आपण निवडणूक लढवावी. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. असा अशी गळ घातली. राजश्री अहिराव यांनी देखील कार्यकर्त्यांच्या आग्रहाला प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी निवडणूक लढविणार या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.
नांदूर नाका परिसरातील प्रसिद्ध मंगल कार्यालय,संजीवनी लॉन्स
कार्यकर्त्यांची कष्ट वाया जाणार नाही : राजश्री अहिरराव
ताई तुम्ही तहसीलदार पदाचा राजीनामा दिला. पण पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही. मागील अनेक दिवसांपासून तुम्ही मतदार संघ पिंजून काढला. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला निश्चितपणे निवडून आणू, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे मी निवडणूक लढविण्याचा निश्चय घेतला. कार्यकर्त्यांचे कष्ट वाया जाऊ देणार नाही.