देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी तब्बल १८ उमेदवार इच्छुक आहे. यापैकी सध्याच्या घडीला माजी आमदार योगेश घोलप आणि माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांच्या नावामध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, याविषयी उत्सुकता लागून आहे.
पुत्रासाठी बबनराव घोलप मैदानात
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देतो याकडे मतदारसंघातील सामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. माजी आमदार योगेश घोलप आणि तहसीलदार पदाचा राजीनामा देणाऱ्या राजश्री अहिरराव यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदारपणे मतदार संघात सुरू आहे. दोघांपैकी एकाचे नाव अंतिम केले जाईल. पक्ष कोणाला उमेदवारी देतो, यावर दोघांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. माजी आमदार योगेश घोलप यांच्यासाठी स्वतः बबनराव घोलप मैदानात उतरले आहे. दोन दिवसापासून शरद पवार यांच्या सतत संपर्कात आहे. कोणत्याही परिस्थितीत पुत्र योगेश घोलप यांना उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील आहे. योगेश घोलप यांच्या उमेदवारीसाठी बबनराव घोलप ठिय्या मांडून बसलेले आहे.
राजश्री अहिरराव यांची जोरदार मोर्चे बांधणी
राजश्री अहिरराव यांनी देखील जोरदार मोर्चे बांधणी केलेली दिसते. देवळाली मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी १८ इच्छुक आहे. यापैकी जवळपास १५ ते १६ इच्छुकांना आपल्या बाजूने केले असल्याची असल्याची चर्चा आहे. 16 इच्छुकांनी राजश्री अहिराव यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता नेमकी उमेदवारी कोणाला द्यावी, याचा निर्णय घेण्यासाठी मोठा पेच निर्माण झाल्याचे समजते.